२४ तासांनी लालबागच्या राजाला निरोप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

demo-image

२४ तासांनी लालबागच्या राजाला निरोप

मुंबई, दि. २९ : ढगांचा कडकडाट, काही काळ मुसळधार वरूणराजाची वृष्टी अशा वातावरणात सुमारे २४ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर मुंबईकरांनी शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजाला निरोप दिला. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास मंडपातून राजाने प्रस्थान ठेवले आणि शुक्रवारी सकाळी आठच्या सुमाराचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. 

व्हिडिओ पहा...👇


तेव्हा लाखोंच्या समुदायाने बाप्पाचे दर्शन घेतले. कोळी बांधवांच्या बोटीने त्याला कडक सलामी दिली. लालबागचा राजासाठी खास तराफा तयारच होता. त्यावर आरूढ होऊन राजा खोल समुद्राच्या दिशेने निघाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. 

IMG_20230929_190303


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *