मुंबई, (दादासाहेब येंधे) : शेजारी देशांसोबत आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाच्या अनुषंगाने जारी केलेला सुरक्षा अलर्ट, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांचे संयुक्त सुरक्षा सतर्कता अभियानांतर्गत विशेष घातपात विरोधी तपासणी, व्हिजीबल पोलिसींग व रूट मार्चचे सीएसएमटी रेल्वे टर्मिनस येथील लोकललाईन व मेनलाईन परिसरात येथे नुकताच दि.०७ मे रोजी आयोजित केला होता.

या अभियानात मा.श्री. सुधाकर शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग तसेच श्री. रणजित कुमार बरुवा, सहायक सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी यांचे उपस्थितीत वपोनी. विजय तायडे यांचेसह पोनि श्री रविंद्र शिवराम पवार, पोउपनि श्री. मोहन ईर, पोउपनि श्री. संदीप गायकवाड, मपोउपनि श्रीमती. माने, पोउपनि श्री. श्रीमंत सोडगी, पोउपनि श्री. बिपीन पाटील, एटीसी व गोपनीय अंमलदार, १०० पोलीस अंमलदार, दादर रेल्वे पोलिस ठाणे येथील पो.नि.श्री. आवारे यांचेसह ४० पोलिस अंमलदार, १० होमगार्ड, बिडीडीएस पथक

लोहमार्ग मुंबई यांचेकडील पोउपनि श्री. केदारे, श्वान पथक - रुद्रा / साशा, हॅण्डलर- म्हात्रे / मेमाणे, तांत्रिक - जाधव, धनकुटे, क्यूआरटी पथक, लोहमार्ग मुंबई यांचेकडील हिट क्र. १ व २ मधील १० पोलिस अंमलदार, आरपीएफ सीएसएमटी यांचेकडील ०८ अधिकारी व ६० कर्मचारी

आरपीएफ सीएसएमटी यांच्याकडील श्वान पथकातील स्नीफर डॉग- बाँड / डॅनी, हॅण्डलर- सचिन गुप्ता / संतोष यादव, सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा