मुंबई, दि. २८ : गणेश विसर्जन उत्साहाचा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा लालबागचा राजाचीही विसर्जन मिरवणूक सुरू झाली असून हजारोंच्या संख्येने गणेशभक्त या मिरवणुकीत सामील झाले आहेत. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या दृश्याने संपूर्ण राज्याचे मन मोहून गेले आहे. सगळीकडे 'लालबागच्या राजाचा विजय असो, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष दुमदुमत आहे.
0 टिप्पण्या