ताडदेव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, (दादासाहेब येंधे) : ताडदेवच्या रहिमतबा या इमारतीमधील दोन बंद घरांचे लॉक तोडून ४३० ग्रॅम सोन्याची चोरी झाली होती. आरोपी घरफोडी करून मुंबईतून पळून जाण्यास यशस्वी ठरले होते. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने दोन चोरांना रतलाम रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकल्या.

ताडदेवच्या साने गुरुजी मार्गावरील रहिमतबा इमारत एक मधील दोन रूम बंद होत्या. हीच नामी संधी साधत चोरांनी त्या दोन्ही रूमकडे आपले लक्ष वळवले. त्यांनी पद्धतीशीर कट रचून त्या दोन्ही बंद रुमचे लॉक तोडले आणि एकूण ४१३ ग्रॅम वजनाचे सोन्याची चोरी केली. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने समांतर तपास सुरू केला. तपास सुरू असताना दोन्ही आरोपी हे महाराष्ट्राबाहेर पळून गेले असून ते रतलाम येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदरचा उत्कृष्ट तपास मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन व मा. सहा. पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) श्री. सुनिल चंद्रमोरे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, स.पो.नि. अमोल माळी, पो.ह. अरुण घाटकर, आकाश मांगले, वैभव गिरकर, पो.शि. विकास चव्हाण, पोशिचा. मारुती खेडकर यांनी गुन्हे शाखेच्या इतर पोलीस पथकाच्या मदतीने पार पाडली आहे. रतलाम जंक्शन येथील रेल्वे पोलीस व जी.आर.पी.एफ. पोलीस यांचेही सहकार्य गुन्हेगारांना अटक करण्यासाठी लाभले.
_1.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा