मुंबईत विमानाने येऊन बँकेच्या ATM मधून रोकड चोरणाऱ्या पंजाबमधील टोळीला अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, २० जून, २०२५

demo-image

मुंबईत विमानाने येऊन बँकेच्या ATM मधून रोकड चोरणाऱ्या पंजाबमधील टोळीला अटक

मुंबई, दि. २० : सुट्टीच्या दिवशी विमानाने मुंबईत येऊन एटीएम मशीनमधून रोकड लुटून विमानाने पळून जात असलेल्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने मागील काही दिवसांत घाटकोपर आणि नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अभुदय बँकेच्या एटीएम मधील जवळपास १२ लाख रुपयांची रोकड चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%20%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0

नेहरू नगर पोलीस ठाणे आणि परिमंडळ-६च्या पथकाने या टोळीला पंजाब येथून अटक करून चोरीच्या पैशांतून विकत घेतलेली स्कोडा गाडी जप्त केली असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडेकर यांनी दिली.


जसबीर सिंग सुखदेव सिंग (२९), लखबीर सिंग बलदेव सिंग (३१), गुरुप्रीत सिंग कर्नल सिंग (२७) आणि रछपाल सिंग बलदेव सिंग (३७) असे अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. हे सर्वजण पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यात राहणारे आहेत. रविवार १ जून रोजी या टोळीने पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम येथील अभ्युदय बँकेच्या बाहेर असलेले एटीएम मशीन उघडून त्यातील ८ लाख ८६ हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घाटकोपर पोलीस या टोळीचा शोध घेत असताना ७ जून रोजी बकरी ईदच्या दिवशी या टोळीने कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील अभुदय बँकेच्या एटीएम मशीन उघडून ३ लाख ७ हजार रुपयांची रोकड चोरी करून पळ काढला होता. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


परिमंडळ-६ च्या विशेष पथकाने कुर्ला नेहरूनगर तसेच रेल्वे स्थानक, कुर्ला टर्मिनस, येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे सर्वजण सहार विमानतळाच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. परिमंडळ-६ आणि नेहरू नगर पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून पंजाब येथून या टोळीला अटक केली. पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यात राहणाऱ्या या टोळीत रछपाल सिंग हा एटीएम मशीन टेक्निशियन असून तो एटीएम मशीन तोडफोड न करता मशीन उघडून त्यातील रक्कम चोरी करीत होता. या टोळीने चोरीच्या पैशातून स्कोडा कार विकत घेतली असून पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पंजाब राज्यातून सुट्टीच्या आदल्या दिवशी मुंबईत विमानाने येऊन मुंबईतील एटीएम सेंटरची रेकी करून सुट्टीच्या दिवशी ही टोळी चोरी करीत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20IMG-20250618-WA0037

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *