फॅशनबददलचे गैरसमज - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १४ मे, २०२१

फॅशनबददलचे गैरसमज

फॅन आणि सौंदर्य नेहमी एकत्र चालतात. आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो आणि स्वतःला ज्याप्रकारे प्रेझेंट करतो, या गोष्टीवर हे अवलंबून असते की, आपण फॅनबददल किती जाणकार आहोत. कारण फॅनबददल बऱ्याच गैरसमजुती आहेत.

- ब्लॅक प्रत्येक ड्रेसवर छान दिसते

एकदम चूक! जर तुम्ही असा विचार करीत असाल, की ब्लॅक रंग सगळया रंगांबरोबर चालतो तर हे खोटं आहे. ब्लॅक हा रंग ब्लॅक रंगाबरोबरच सुंदर दिसतो. ब्लॅक हा रंग पांढऱ्या रंगाबरोबरही छान दिसतो. पेस्टल कलरही ब्लॅक रंगाबरोबर छान दिसतात. पण, जास्त ब्लॅक रंग डोळयावर येतो. जर तुम्ही बारीक दिसू इच्छित असाल, तर ब्लॅक रंगाला तुमचा चांगला मित्र माना.

- उंच मुली प्रिंटेड रंग घालू शकत नाहीत

हे पण चुकीचेच आहे. खरेतर प्रिंटेड ड्रेस  शरीराला समतोल भासवितो. जर तुमची उंची जास्त किंवा कमी असेल, तर जास्त मोठी किंवा जास्त प्रिंट असणारे कपडे निवडू नका. मिडियम प्रिंटचा असा ड्रेस निवडा जो आकर्षक असेल, पण जास्त लाऊड वाटणार नाही. 

- माझ्याकडे नवे कपडे नाहीत

कधी-कधी असं होतं की, पार्टीला जाण्यापूर्वी आपण आपला सगळा वाॅर्डरोब तपासतो, पण एकही असा ड्रेस दिसत नाही. जो आत्ता घालून निघू शकतो. सगळयात शेवटी तोंडातून एकच वाक्य बाहेर पडते. काय घालू, माझ्याकडे तर नवीन कपडेच नाहीत... अशा वेळेस वाॅर्डरोबमधील सगळे कपडे बाहेर काढा आणि ते वेगवेगळे करा. बघा, तुम्हाला नक्की दोन-तीन ड्रेस मिळतील. जे तुम्ही खूप दिवसांपासून घातलेले नाहीत. मग, तो ड्रेस नव्या पद्धतीने कसा वापरता येईल, याचा विचार करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज