महिला पोलीस देखील जखमी...
मुंबई, दि. ७ : लोकलमधील सीटवर कोणी बसायचे, यावरून महिला प्रवाशांचे भांडण इतके टोकाला गेले की, काल दोन गट एकमेकींना भिडले, आणि सुरू झाली फ्री स्टाईल मारामारी! यात मारामारी सोडविण्यासाठी गेलेली महिला पोलीसदेखील जखमी झाली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून काल बुधवारी पनवेलच्या दिशेने निघालेल्या महिला लोकलच्या डब्यातून आब्जयु खान आणि जुबेरखान या दोन महिला प्रवास करीत होत्या. त्या ठाणे रेल्वे स्थानकातच गाडीत बसल्या. गाडी कोपरखैरणे रेल्वे स्थानकात आल्यानंतर स्नेहा देवडे ही महिला रेल्वे डब्यात बसली.
त्यावेळी स्नेहा या महिलेचा जागेवरून त्या दोन महिलांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. गाडी तुर्भे रेल्वे स्थानकात येताच आब्जयु खान आणि जुबेरखान या दोघींनी स्नेहा हिस मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला. अन्य महिला प्रवाशांनी त्यांचे भांडण सोडवण्यास पुढाकार घेतला. पण, त्या दोघी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्या नेरुळ स्थानक येईपर्यंत स्नेहा हिस मारतच होत्या.
व्हिडीओ पहा...👇
गाडी थांबल्यावर स्नेहा यांनी नेरुळ स्थानकावर असलेल्या महिला पोलीस शारदा उगले यांना बोलावले. उगले यांनी भांडण मिटविले. मात्र, गाडी सुरू झाल्यानंतर त्या दोघींनी पुन्हा स्नेहा हिस मारण्यास सुरुवात केली. उगले पुन्हा मध्ये पडल्या असता हल्लेखोर महिलांनी त्यांनाही मारण्यास सुरुवात केली.
व्हिडीओ पहा...👇
लेडीज डब्यात झालेला या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा