दाखल गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानपूर्वक केला परत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

दाखल गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानपूर्वक केला परत

मुंबई, दि. १२ : भारताच्या स्वातंत्र्य दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सर्वत्र 'आझादी का अमृत महोत्सव' हा उपक्रम मोठया प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे कडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

                

त्याअनुषंगाने आज दिनांक १०/०८/२०२२ रोजी दुपारी १५.०० ते १५.४५ वा. दरम्यान सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामधील उघडकीस आलेल्या गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

             

सदर कार्यक्रमात एकूण १२ मोबाईल फोन व ०२ लॅपटॉप असा एकूण रु. ३,१५,०००/-  किंमतीचा मुद्देमाल उपस्थित फिर्यादी यांना आमचे हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

                  



सदर कार्यक्रमदरम्यान उपस्थित फिर्यादी यांनी आपले मनोगत व्यक्त करून, कोणतीही आशा, अपेक्षा नसताना देखील रेल्वे पोलिसांनी आमचा मुद्देमाल परत केल्याबद्दल खूप खूप आभार मानले.


          

सदर कार्यक्रम हा हर घर तिरंगा अभियानाचे अंतर्गत असल्याने, स्वातंत्र्य चे अमृत महोत्सवाचे महत्व समजावून सांगण्यात आले तसेच प्रत्येकाने १५ ऑगस्ट रोजी आपआपल्या घरी भारतीय तिरंगा ध्वज लावण्याबाबत आवाहन ही करण्यात आले.  


उपस्थित फिर्यादी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सीएसएमटी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. 

               

यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे, सहायक पोलीस उप निरीक्षक संजय काझरोळकर, पोलिस हवालदार मल्लिकार्जुन कैलास बिराजदार, राजन च चौलकर, महिला पोलिस अमलदार योगिता पानसरे, भाविका पारेख असे उपस्थित होते. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. ए. इनामदार यांनी दिली आहे. 


Grp

1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज