कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १ एप्रिल, २०२४

demo-image

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

०१/४/२०२४

मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ३२ व्या रक्तदान शिबिरात १२० रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. तसेच कल्पतरू समूह म्हणजे आपलं हक्काचं मंडळ असल्याचे गौरवोद्गार काढले.

%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%201

वार्प इंजियनरिंग चे संचालक श्री प्रभूदास गोला यांनी ३२ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल कल्पतरू समूहाला शुभेच्छा दिल्या. व मंडळाला संबोधताना म्हटले की, या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. 

IMG20240331093338

सदर रक्तदान शिबिरास नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी रविशंकर डोके, पवार, स्थानिक डॉक्टर सचिन दोशी, डॉक्टर कम्पाउंड मित्र मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ तसेच विविध सामाजिक संस्था यांनी हजेरी लावली. सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, अविरात, महेश नानचे, स्वप्नील, शुभम स्वार, वैष्णवी, मल्हार, अमेय परब, श्री. बाळा परब, प्रमोद, विकास सक्रे, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, अथर्व साळसकर, नंदू साळसकर, आदित्य देसाई,  संकल्प नलावडे, विनायक येंधे, मिलिंद चाळके, अनंता घाडीगांवकर, समीर नाईक, नंदू मोरये, आनंदा पाटील आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. 

%E0%A5%A9%E0%A5%A8%20%E0%A4%B5%E0%A5%87%20%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%202024


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *