कलरफुल आऊटफिट्स - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

कलरफुल आऊटफिट्स

पॉझिटिव्ह एनर्जी

फॅशनच्या जगात काही असे पॅटर्न तसेच स्टाईल आहेत की, ज्या कधीच जुन्या किंवा आऊटडेटेड होत नाहीत. बॉटनेट टॉप  ट्राउझर किंवा प्लाझो सोबत परिधान केल्यास ऑफिस लूक सोबतच एक नवे एक्सपिरिमेन्ट सुध्दा आपण करू शकतो.

'कि होल नेक' - जर तुम्ही तुमच्या लुक करिता आउटफिटसाठी जागरूक असाल आणि नवीन काहीतरी करण्यास पसंत करीत नसाल तर  'कि होल नेक' टी शर्ट किंवा कुर्ता जीन्ससोबत वापरू शकता. हा आऊटफिट सर्वांत सुंदर दिसेल.





'स्पेगेट्टी विथ लॉंग जॅकेट' -  जर आपल्याला आऊटफिट सोबत थोडं बोल्ड दिसायचं असेल तर हे कॉम्बिनेशन आपण जरूर वापरून पाहायला पाहिजे. ट्राउझर किंवा कॉन्ट्रास्ट स्पेगेट्टी आणि ट्राउझरला मॅच करणारे लॉंग जॅकेट तुमचा आत्मविश्वास तसेच ऑफिस लूक वाढविण्यास मदत करेल.



'व्ही नेक ट्युनिक चा जमाना आहे' - व्ही नेक ट्युनिक सुद्धा काही दिवसानंतर ऑफिसला जाताना वापरायचे एक सुंदर कॉम्बिनेशन असू शकते. या व्ही नेक ट्युनिक सोबत तुम्ही ट्राउझर किंवा प्लाझो ट्राय करू शकता. व्ही नेक ट्युनिक मध्ये खूप सारे प्रकार उपलब्ध आहेत. 



साईड पॉकेट कुर्ता - जर तुम्ही वेस्टर्न आऊटफिट पसंत करत नसाल तर आपण सध्या सगळ्यांच्या पसंतीस आणि टेंड्समध्ये असलेले साईड पॉकेट कुर्ता लॅगीन्स किंवा जेगीन्स सोबत ट्राय करू शकता. तसेच साईड पॉकेटवाले फ्रॉक सुद्धा वापरता येऊ शकतात.



पोलकं डॉट्स - डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूरचा सिनेमा 'बॉबी' पासून हिट झालेली ही डिझाईन कित्येक वर्षांनंतर अजूनही लोकांच्या पसंतीस उतरत आहे, आणि कित्येकजण याला फॉलो देखील करीत आहेत. याला आपण प्लाझो सोबत ट्राय करून एक हटके लूक मिळवू शकता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज