धारावी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई : धारावीत राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेवर तिच्या घरात घुसून बलात्कार करणाऱ्या दोघा आरोपींना अखेर धारावी पोलिसांनी पकडले. दोघे आरोपी सख्खे भाऊ असून त्यांना कोर्टात हजर केले असता २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
व्हिडिओ 👇 पहा...
पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ यांची पत्रकार परिषद
१० मे २०२२ रोजी धारावीच्या अबूबकर चाळीत राहणारी २० वर्षीय विवाहिता दुपारी घरात एकटीच असताना दोघे अज्ञात तरुण चेहऱ्यावर मास्क लावून घरात घुसले आणि दोघांनी चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. आरोपींची नंतर घटनास्थळावरून पळ काढल्यावर पीडित विवाहितेने धारावी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. धारावी पोलिसांनी तात्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप सालेकर, भारत सलगर, उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे व पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पण, धारावीतल्या गल्ल्यांमुळे आरोपींचा शोध घेणे जिकरीचे बनले होते. पोलिसांनी हार न मानता धारावीतील शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे, परिसरातील हजारो सीडीआरचा डाटा तपासला तेव्हा फुटेजमध्ये दोघे आरोपी रस्त्यावरून जाताना एका व्यक्तीला हात दाखवताना दिसले त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्या दोघा आरोपींची नावे समोर आली. अनिल (वय१९) आणि निलेश चौहान (वय२०) अशी आरोपींची नावे असून दोघेही सख्खे भाऊ असून विलेपार्ले येथे राहतात. अनिल सलूनमध्ये तर निलेश मजुरीचे काम करतो. दोघांनाही अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते.
फेसबुकवरची ओळख महागात पडली
पीडित विवाहिता दोन महिन्यांपूर्वी मुंबईत लग्न करून आली होती. फेसबुकवर अनिल आणि पीडितेची ओळख झाली होती. दोघे एकदा भेटलेदेखील होते. पण १० तारखेच्या दुपारी विवाहिता घरात एकटी असताना अनिल भावाला घेऊन तिच्या घरी गेला आणि दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. धारावी पोलीस अधिक तपास करीत असल्याचे उपायुक्त प्रणव अशोक यांनी सांगितले.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा