भारताने वानखेडे कसोटीवर फास आवळला
मुंबई : कसोटी क्रिकेटचा १४७ वर्षांच्या इतिहासात इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताचे अनिल कांबळे यांनी एकाच डावात दहा बळी घेण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या अनोख्या वीरांच्या पंक्तीत न्युझीलंडचा व मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने स्थान मिळवले आहे. वानखडे कसोटीत त्याने ११९ धावांच्या बदल्यात भारताचे दहा फलंदाजाच एक हाती गारद करण्याची किमया साधली.
तिसरा गोलंदाज
एका डावात दहा बळी घेणारा एजाज पटेल कसोटीतील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा एका डावात प्रतिस्पर्धी संघातील सर्व खेळाडुंना बाद करण्याचा विक्रम इंग्लंडचे जिम लेकर यांनी मँचेस्टरमध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात १९५७ मध्ये केला होता. अनिल कुंबळे या पंक्तीत द्वितीय स्थानावर उभा आहे. त्यांनी १९९९ मध्ये दिल्लीतील पाकिस्तान विरुद्ध दहा बळी घेतले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा