दुमजली झोपडी कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १० जून, २०२२

दुमजली झोपडी कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू

मुंबई : वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर येथे गुरुवारी मध्यरात्री उशिरा दुमजली झोपडी कोसळून उद्भवलेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १७ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. व्हिडीओ👇


शाहनवाज आलम (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर येथील झोपडपट्टीतील लोखंडी पत्र्याचे बांधकाम असलेली दुमजली झोपडी गुरुवारी रात्री १२.२० मिनिटांच्या सुमारास कोसळली. यामुळे या झोपडीच्या ढिगाऱ्याखाली १९ जण अडकले गेले. या दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवासी त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांच्या कडून मदत सुरू असताना अग्निशमन दल, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या बचावकार्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १९ जणांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील गंभीर जखमी असलेल्या शहानवाज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर १८ जखमींपैकी १७ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्या जखमींमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज