सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या ०५ तासांत अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी शोधून काढली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या ०५ तासांत अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी शोधून काढली

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेस व तिच्या साथीदारास अटक


मुंबई, दादासाहेब येंधे : सुफिया शारुख मुल्ला ही महिला २४ सप्टेंबर  रोजी दुपारी १ वाजता त्यांचा मुलगा अरहान, (वय,३ वर्षे) व लहान मुलगी सोफिया (नाव बदललेले), वय १० महिने यांच्यासह सीएसएमटी मेनलाईन रेल्वे स्टेशन मेनलाईन हॉल मधील तिकीट काऊंटरच्या समोर झोपल्या असताना अज्ञात व्यक्तीने तक्रारदार यांच्या झोपेचा फायदा घेवून त्यांच्या दहा महिन्यांच्या मुलीस, त्यांचे संमतीशिवाय पळवून नेलेबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेत , गु रजि.नं. ८२५/२०२४, कलम १३७ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता, एक संशयीत महिला व तिचा साथीदार असे त्या अल्पवयीन मुलीस घेवून पनवेलला जाणारी स्लो लोकल पकडून निघून जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. त्यानुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून रेल्वे हद्दीतील व शहर हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजचा सतत मागोवा घेतला असता आरोपी महिला व तिचा साथीदार हे जे. जे. रोड, जे. जे. हॉस्पीटल गेट नं. ०८, नूरबाग जंक्शन, परिजात हॉटेल, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार जंक्शन, मोहम्मद अली रोड ते पायधुनी परिसर असे चालताना दिसून आले. पायधुनी परिसरात स्थानिक रहिवाशी यांच्याकडे तपास करून अल्पवयीन दहा महिने वयाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेचा व तिच्या साथीदाराचा शोध घेवून त्यांना शिताफीने अटक केली. मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे व त्यांच्या पथकाने सदरचा गुन्हा हा अथक परिश्रम घेऊन पाच तासांच्या आत उघडकीस आणला आहे.


तरी सर्व महिला रेल्वे प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, महिला प्रवाशांनी रेल्वे प्रवासात त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांना एकटे सोडून जावू नये अथवा त्यांना नजरेआड जावू देऊ नये. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज