सी लिंकवरील दुर्घटनेचा विडिओ व्हायरल
मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरचा एक विडिओ सध्या व्हायरल झाला आहे. वरळी सी लिंकवर भीषण अपघात घडला आहे. या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
व्हिडिओ पहा...👇
मिळविलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि, टॅक्सी चालकाने धडक दिल्यानंतर दोघेही हवेत उडाले आणि दूरवर जाऊन पडले. या अपघातात अमर मनीष जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला. अमर मनीष जरीवाला हे प्राणी आणि पक्ष्यांबाबत अत्यंत संवेदनशील होते आणि हीच सवेंदनशीलता त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली, असे म्हटले जाते.
अमर यांनी वांद्रे वरळी सी-लिंकवर आपल्याच करणे जखमी झालेल्या घारीला वाचविण्यासाठी गाडी थांबविली होती. अमर मनीष जरीवाला यांनी त्यांची कार थांबविली आणि चालक श्याम सुंदर कामत यांच्यासह घारीला वाचविण्यासाठी खाली उतरले. अमर आणि त्यांचा ड्रायव्हर खाली उतरला असता दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या टॅक्सीने त्यांना धडक दिली. टॅक्सीची धडक इतकी जोरदार होती की अमर आणि चालक शयाम हे दोघे हवेत फेकले गेले. सदर विडिओ समोर आल्यांनतर पोलिसांनी धडक देणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा