स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया रॅली
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने रविवारी ठाणे फ्रीडम सायक्लोथॉन रॅलीला सायकल स्वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे उद्घाटन महापालिका मुख्यालय येथे उपमहापौर पल्लवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
काल सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालय ते गेटवे ऑफ इंडिया आणि येथून सकाळी ठाणे फ्रीडम सायक्लोथॉन या ७५ किलोमीटर रॅलीला सुरुवात झाली. ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया आणि परत ११ वाजता ही रॅली ठाण्यात दाखल झाली. या रॅलीमध्ये महिला सायकल स्वरांचाहीसहभाग मोठ्या प्रमाणात होता. हिरानंदानी मिडोज येथे सकाळी ७ ते ८ या वेळेत आयोजिलेल्या 'ठाणे कार फ्री रॅली सायकल टू वर्क' या रॅलीचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झाला.
प्रत्येकाने सायकलचा वापर करण्याचे ठरवले तर निश्चित प्रदूषण मुक्त शहर करू असा विश्वास व्यक्त करीत उपमहापौर कदम यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सायकल स्वरांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा