मुदत संपताच पोलीस कारवाई सुरू, विना हेल्मेट ६,२७१ जणांना दंड
मुंबई : सहप्रवाशासाठी हेल्मेट सक्तीची दिलेली पंधरा दिवसांची मुदत संपताच मुंबईत वाहतूक पोलिसांनी गुरुवारपासून धडक कारवाई सुरू केली. पोलिसांनी पहिल्या दिवशी हेल्मेट परिधान न केलेल्या ३,४२१ सहप्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला.
व्हिडीओ पहा...👇
चालक, सहप्रवासी मिळून एकाच दिवशी ६,२७१ जणांवर ई चलन जारी करण्यात आले. चालक/आणि सहप्रवासी यांनी हेल्मेट परिधान करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या मुख्यालयातून २५ मे रोजी मुंबईकरांसाठी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. यामध्ये मुंबईमध्ये अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवत चालवतात. तसेच, दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती हेल्मेटचा वापर करत नाही.
दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेले व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे यासाठी पोलिसांनी १५ दिवसांची मुदत दिली होती. समाजमाध्यम तसेच इतर माध्यमातून मुंबईकरांनी पोलिसांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. मात्र, कायद्यानुसार अंमलबजावणी करावी लागेल असे सूतोवाच पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा