मुंबई, दि. ९ : जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि मुंबई चकाचक ठेवणाऱ्या बृहन्मुंबई महापालिका ई विभागातील महिला कर्मचारी यांना भेटवस्तूंचे वाटप करून सन्मान केला.
महिला कर्मचारी परिसरात महत्वपूर्ण काम निष्ठेने व जीवाची पर्वा न करता करत असतात. आज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची जागतिक महिला दिनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तद्नंतर महिलांना भेटवस्तूंचे वाटप करून एक नवा आदर्श समजासमोर ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी संथेचे अध्यक्ष अमित पवार, गणेश शिरसागर, गणेश पार्टे, केशव परब, अविनाश पवार, किरण जाधव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा