मुंबई, दि. १२ : ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीच्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. फरहान गुलजार खान, प्रतीक जाधव, विजय खटके अशी त्या तिघांची नावे आहेत. यातील एकजण हा रसायन शास्त्रात एम.एस.सी. पदवीधर असून त्या तिघांकडून पोलिसांनी २२ लाख ६४ हजार रुपयाचे एमडी ड्रग जप्त केले. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेंद्र खांगळ हे गस्त करत होते. तेव्हा पोलिसांनी फरहानला ताब्यात घेतले. त्याच्या स्कोडा गाडीमधून पोलिसांनी ७१ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले. पोलिसांनी फरहानला ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.
त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक राजीव चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश गुरव, उपनिरीक्षक खांगळ, काशीद, जगताप, इटकर, मंडले, बडे, पिसाळ, शहाणे, भावसार, देसाई, साळुंखे, लोखंडे, वाघमारे, अवघडे आदीच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी फरहानची कसून चौकशी केली असता चौकशीत प्रतीकचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रतीकला अटक करून त्याच्याकडून एक कार जप्त केली. त्या दोघांच्या चौकशीत विजय खटकेचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी विजयला पालघर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून २८० ग्रॅम एमडी जप्त केले. विजय हा स्वतः एमडी बनवून तो फरहान आणि प्रतीकच्या माध्यमातून ड्रगची विक्री करायचा. या टोळीने मुंबईत ड्रगची तस्करी केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा