फक्त २६ मिनिटांत मुंबई पोलिसांनी लावला बेपत्ता मुलीचा शोध - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ५ जुलै, २०२३

demo-image

फक्त २६ मिनिटांत मुंबई पोलिसांनी लावला बेपत्ता मुलीचा शोध

मुंबई पोलिसांची जबरदस्त कामगिरी,
आईने मानले आभार


मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांनी एका तीन वर्षे बेपत्ता मुलीचा अवघ्या २६ मिनिटांच्या आत शोध घेतला आहे. मावशीने दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा पोलिसांनी काही मिनिटांमध्येच बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला कुटुंबियांकडे पुन्हा सुपूर्द केले आहे.


मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मुंबईतील वडाळा पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती मिळाल्यानंतर केवळ २६ मिनिटात तिला शोधून काढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २ जुलै रोजी घडली आहे. जेव्हा मुलीच्या मावशीने वडाळा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुलगी सोबत असताना अचानक बेपत्ता झाल्याचे मावशीने पोलिसांना सांगितले होते. तक्रारीची गंभीर दखल घेत बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी सर्व बीट मार्शल आणि गस्त घालणाऱ्या वाहनांना याबाबत कळविण्यात आले होते.

IMG_20230704_190827

पोलिसांना तक्रार प्राप्त होताच वडाळा पोलिसांचे निरीक्षक आदित्य साष्टे यांनी बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी तातडीने सर्व माहिती गोळा केली. वडाळा पोलिसांच्या हद्दीतील पोलिसांचे सर्व बीट मार्शल आणि वडाळा पूर्व भागातील चिंधी गल्ली परिसरात  तसेच वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या परिसरात हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी मोबाईल वाहने तैनात करण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.


तपासादरम्यान बीट एकवर नियुक्त मार्शल राजकिरण उत्तम बिलासकर यांना वडाळा येथील रहमानिया मशिदीजवळ एक उभी असलेली मुलगी दिसली. बिलासकर यांनी त्या मुलीजवळ जाऊन तिला ताब्यात घेतले आणि ती सुरक्षित असल्याचे खात्री केली. अहवाल देण्यापासून ते हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेण्यापर्यंतच्या संपूर्ण ऑपरेशनला फक्त २६ मिनिटे लागली असे पोलिसांनी सांगितले.


बेपत्ता मुलीच्या वेळेवर शोध घेण्याच्या प्रयत्नासाठी आदित्य साष्टे आणि बीट मार्शलच्या तत्पर कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. हरवलेली मुलगी सुरक्षितपणे तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आली आहे. मुलीच्या आईने पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल आणि मुलीला लवकरात लवकर शोधून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांनी केले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक आदित्य साष्टे आणि राजकिरण उत्तम बिलासकर यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.


%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%AC%20%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7




Press note 
2028

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *