गोरेगाव, वडाळ्यात ७५ लाखांचे ड्रग्स जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

demo-image

गोरेगाव, वडाळ्यात ७५ लाखांचे ड्रग्स जप्त

 तिघेजण जेरबंद

मुंबई, दि. १ :  ७५ लाख रुपयांच्या ड्रग्ससह तीन आरोपींना गोरेगाव आणि वडाळा येथून गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्सच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली. नितीन शंकर म्हामुणकर, नदीम एजाज अली व हौसेब अमिन गौस अशी या तिघांची नावे असून या तिघांकडून पोलिसांनी १५० ग्रॅम हिरॉईन आणि शंभरहून अधिक एमडीएम टॅबलेटचा साठा जप्त केला आहे. या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द, महाराष्ट्र नगर मधून सहा किलो ४४ ग्रॅम वजनाचे चरस नावाचा अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याची किंमत जवळपास ३० लाख २२ हजार रुपये असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.


नाईट क्लब आणि पार्ट्यांमध्ये तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या एमडीएमए टॅबलेट विक्रीसाठी काहीजण वडाळा परिसरात येणार असल्याची माहिती वरळी युनिटचे अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने गुरुवारी आरएके मार्ग परिसरात साध्या वेषात पाळत ठेवून नितीन वामनकर या ३८ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते त्याच्या अंग जडतील पोलिसांना शंभर एमडीएमए टॅबलेटचा साठा सापडला त्याची किंमत जवळपास १५ लाख ४२ हजार रुपये आहे झटपट पैशांसाठी आरोपी या टॅबलेटचे विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

2196_1%20(1)

2196_2%20(1)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *