रोहित शर्माचे दुसऱ्या डावातील शतक तर शार्दूल ठाकुरची अष्टपैलू कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि इंग्लंड च्या भूमीत इतिहास घडवला ओवल मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात ९९ धावांची पिछाडी असतानाही भारताने दुसर्या डावात मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडला २१० धावांत गुंडाळले. भारताकडून रोहित शर्मा, ऋषभ पंत यांनी फलंदाजीत तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा, उमेश यादव यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. शार्दुल ठाकूरने दोन्ही विभागांत शानदार कामगिरी केली. या विजयाने भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. ५० वर्षानंतर म्हणजेच १७१ नंतर भारताने विजय मिळविला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा