मुंबई, दि. १४ : देवनार कत्तलखान्यातून एका व्यापाऱ्याची ११ लाख रुपये असलेली बॅग एका रिक्षाचालकाने चोरून नेली होती. सदर घटनेबाबत देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीला पुण्यातून अटक केली.

बकरी ईदनिमित्त देवनार कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची विक्री होते. विविध राज्यातून शेतकरी आणि बकरी विक्रेते येथे बकरे विक्रीसाठी घेऊन येत असतात. राजस्थान मधून आलेल्या एका व्यापाऱ्याने बकरे विक्रीतून मिळालेले ११ लाख रुपये एका बॅगेत ठेवले होते. पण, एका अज्ञात चोराने ही बॅग लंपास केली होती. ही गोष्ट लक्षात येताच व्यापाऱ्याने याबाबत तत्काळ देवनार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आरोपी पुण्यातील पिंपरी येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुण्यात जाऊन अल्ताफ कुरेशी (वय, २५) याला अटक केली. अल्ताफ कुर्ला येथे राहणारा असून तो रिक्षाचालक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा