मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील विले पार्ले परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथे भर दिवसा घरात घुसलेल्या दोन तरुणांनी ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेसह मोलकरणीचे हातपाय बांधून घर रिकामं केलं होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला असता दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कटात एका महिलेचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपींनी साडेआठ लाखांचा ऐवज लुटला होता. त्यात अंगावरील दागिने अंदाजे रू. ६,८०,०००/- कपाटातील रोख रक्कम रू. १,०५,०००/- असा ऐवज लुटून नेण्यात आला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना विलेपार्ले येथील तेजपाल स्कीम परिसरातील समर्थ निवास इमारतीत घडली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर ६० वर्षी दत्ताराम डिचोलकर आपल्या आई राधाबाई यांच्या समवेत वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या वयस्कर आईची काळजी घेण्यासाठी संगीता यांना केअरटेकर म्हणून कामावर ठेवलं आहे. घटनेच्या दिवशी रविवारी काही वैयक्तिक कामानिमित्त दत्ताराम हे घराबाहेर गेले होते.
व्हिडिओ पहा....👇
दरम्यान, दुपारी साडेबाराच्या आसपास दोनजण दत्ताराम यांच्या घरात घुसले. यावेळी घरात ८५ वर्षांच्या राधाबाई आणि मदतनीस संगिता दोघीही एकट्याच घरात होत्या. आरोपींनी घरात घुसताच दोघींना चाकुचा धाक दाखवला आणि त्यांचे हातपाय बांधले. तोंडाला चिकटपट्टी लावली. यानंतर आरोपींनी घरातील सोन्या चांदीच्या दागिण्यांसह तब्बल साठे आठ लाखांचा ऐवज लुटून नेला होता.
दुपारी अडीच वाजता दत्ताराम जेव्हा घरी परतले, तेव्हा घराचं दार उघडंच होतं. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहताच त्यांच्या आई आणि मदतनीस दोघी हातपाय बांधलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. दत्ताराम यांनी सर्वप्रथम दोघींची सुटका केली. यानंतर घडलेला प्रकार समजल्यानंतर दत्ताराम यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सदरचा गुन्हा हा दिवसा निवासी परिसरात तसेच ज्येष्ठ महिला व दिव्यांग महिलेच्या बाबतीत घडल्याने त्याची गंभीर दखल घेवून गुन्हे शाखेने सदर गुन्हयाचा तपास चालू केला होता. सदर गुन्हयाच्या समांतर तपास गुन्हे शाखेच्या कक्ष - ८ कडून करण्यात येत होता.
गुन्हयातील आरोपी अतिशय चलाखीने गुन्हा घडल्यापासून मुंबईतून निघून गेला होता. नमूद गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा ठावठिकाणा तांत्रिकरीत्या व मानवी कौशल्याने शोधण्यात आला. तपासादरम्यान नमूद गुन्हयात एक महिला आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिलेकडे चौकशी करून ताब्यात घेण्यात आले असता तिची उलट तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुख्य आरोपी हा ठाणे येथे आहे असे तिने सांगितले असता पोलिसांना ते तांत्रिकरित्या स्पष्ट झाले. प्राप्त माहितीच्या आधारे कक्ष -८ चे पोलीस पथक यांनी आरोपीस सदर परिसरातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेले आरोपी बाबु आनंद सिंदल, (वय २७ वर्षे)व महिला आरोपी श्वेता जयेश लडगे, वय (३५ वर्षे) असून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे.
सदरची चांगली कामगिरी मा. पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. विविक फणसळकर, मा.विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशि व्छुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. विशाल ठाकूर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) श्री. प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि मनोजकुमार प्रजापती, सपोनि मधुकर धुतराज, सपोनि उत्कर्ष वझे/कक्ष-९, सपोनि संग्राम पाटील, सपोनि राहुल प्रभु, पोउनि .विकास मोरे, पोउनि जयेंद्र कानडे, सपोउनि शिरसाट, सपोउनि बनसोडे, पोह/यादव, पोह/किणी, पोह/काकडे, पोह/कुरकूटे, पोह/सावंत, पोह/कांबळे, पोह/सकट, पोशि/रहेरे, पोशि/सटाले, मपोशि/गायकवाड, मपोशि/भिताडे, पोशि/बिडवे, पोशि/साळवे, पोशि होळंबे, पोशि भूमकर/कक्ष-९, पोहचा/कामत, पोशिचा/डवंग यांनी पार पाडली आहे.
सर तुम्हाला अडसेन्स अँप्रोवाल नाही भेटलं का
उत्तर द्याहटवाप्लीज रिप्लाय.