मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी, लालबाग परीसरातील दत्तजयंती उत्सवासाठी प्रसिद्ध असलेले नवबालक क्रीडा मंडळ यांचा उत्सव १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल जयंती पासून सुरू होतो. आजचा बालक दिन या शुभदिनी लहान मुलांना केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी जत्रेतील अनेक खेळांचे (उदा. जम्पिंग बॉल, ट्रेन, झोपाळा आणि फ्लाईंग बोट) आयोजन करण्यात आले होते.
या खेळांचा लहान मुले मनमुराद आनंद घेतात. यासोबतच मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात येते. लहान मुले या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सदर उत्सव खंडित झाला होता. परंतु, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून यावर्षी हा उत्सव साजरा होत आहे.
मंडळाचे प्रमुख विश्वस्त अनिल हेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण देवरुखकर, कार्याध्यक्ष सुनील डीचोलकर, सरचिटणीस मंगेश पिंपरकर, खजिनदार शंकर साळवी, स्वागताध्यक्ष योगेश राणे यांच्या उपस्थितीत सदर उत्सव ५५ व्या वर्षी मोठया जोमात साजरा होत आहे.
सदर कार्यक्रमास स्थानिक शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे तसेच भायखळा विधानसभा संघटक दाऊ लिपारे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
व्हिडिओ👇 पहा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा