७०जण थोडक्यात बचावले, ८० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे काम सुरू असताना घडली घटना
मुंबई, दि. १ : काळबादेवी येथील 'झालान भवन' या ८० वर्षाच्या इमारतीची दुरुस्ती सुरू असताना काल अचानक बिल्डिंगचा एक मोठा भाग कोसळून दुर्घटना घडली. यावेळी रहिवाशी राहत असलेला दुसरा भाग तातडीने रिकामा करण्यात आला. काही वेळातच इमारतीचा दुसरा भागही कोसळला. त्यामुळे याठिकाणी राहणारे ६० ते ७० रहिवासी सुदैवाने बचावले.
काळबादेवी येथील म्हाडाची 'झालान भवन' ही दुरुस्ती सुरू असलेली इमारत कोसळली. या इमारतीत १२ फ्लॅट व्यावसायिक कामांसाठी वापरले जात होते तर ४ फ्लॅट रहिवासी वापरत होते. या ठिकाणी काही सुवर्ण कारागिरही काम करीत होते. मात्र, सदर इमारत धोकादायक स्थितीत असल्याने म्हाडा कडून गेल्या दीड वर्षांपासून इमारत दुरूस्तीचे काम सुरू आहे.
व्हिडीओ पहा...👇
दरम्यान, इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ ५ फायर इंजिन, १ रेस्क्यु व्हॅन, ४ रुग्णवाहिका यांसह घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.
दुपारी १.३० च्या सुमारास इमारतीचा पुढील काही भाग अचानकपणे कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे इमारतीत व परिसरात घबराट पसरली. तातडीने इमारत रिकामी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात म्हणजेच दुपारी २ वाजताच्या सुमारास इमारतीचा पश्चिमेकडील आणखी मोठा भाग पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून रहिवासी बचावले.
फोटो : व्हायरल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा