तक्रारदारच ठरला आरोपी, पोलिसी खाक्या दाखवताच झाला कबूल - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ११ मार्च, २०२५

तक्रारदारच ठरला आरोपी, पोलिसी खाक्या दाखवताच झाला कबूल

सीएसएमटी रेल्वे पोलीसांनी २८,०७,०००/- रू. किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल केला जप्त


मुंबई, (दादासाहेब येंधे) : तक्रारदार किसन केसरसिंग चंदाना,(वय ४०) हा सोन्याच्या दुकानात काम करीत असून तो दिनांक ०५ मार्च रोजी तीन वाजता वैभव ज्वेलर्स येथून सोन्याचे दागिने घेवून पनवेल रेल्वे स्टेशन येथून सीएसएमटी स्लो लोकल गाडीच्या मधल्या जनरल डब्यात सीटवर बसून प्रवास करीत होता. ती गाडी सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्टेशन येथून सुटल्यानंतर किसन यास अचानक अस्वस्थ वाटू लागले व बसलेल्या जाग्यावरच तो झोपून गेला. सुमारे १७.५० वा. त्याला जाग आली त्यावेळी सदरची गाडी सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथून परत मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन येथे पोहचली होती. त्यावेळी त्याने त्याच्याकडील सॅकबॅग, शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन व बंडीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण २८,०७,०००/- रू. किंमतीचा ऐवज हरवला असल्याचे त्याला कळाले. सोन्याचे दागिने व मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत किसन के सरसिंग चंदाना याने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गु. रजि. नं. १६८/२०२५ कलम ३०३(२) भा. न्या. का. अन्वये दिनांक ०६/०३/२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.


सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउनि श्री अर्जुन सांगळे, पोउनि श्री संदिप गायकवाड व पथक यांनी तक्रारदार यांचेकडे सखोल तपास केला. तक्रारदार यांना सोबत घेवून पनवेल ते सीएसएमटी रेल्वे स्थानकापर्यंतचे संपुर्ण सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी केली. परंतू कोणताही धागे दोरे मिळून आले नाहीत. पोलीसांना तक्रारदार याच्यावरच वारंवार संशय आल्यानेे पोलीसांनी तक्रारदार किसन चंदाना यांचेकडे सतत चौकशी सुरू ठेवली. चौकशीला घाबरून तक्रारदार किसन चंदाना यानेच त्याच्या मालकाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तक्रारदार यांचेवर केवळ संशयावरून सातत्याने केलेल्या चौकशीमुळे तक्रारदार किसन चंदाना याने गुन्हा कबुल करून चोरी केलेले सोन्याचे दागिने व स्वतःचा बंद करून ठेवलेला मोबाईल फोन असा एकूण २८,०७,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आलेले असून तक्रारदार किसन केसरसिंग चंदाना यानेच सदर गुन्हा करून पोलीस ठाणेत खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी दागिने जप्त करून पुन्हा मूळ मालकाकडे सुपूर्द केले आहेत.


सदरची कामगिरी मा. श्री रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, मा. श्री सुधाकर शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, सीएसएमटी विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी दिलेल्या सुचना व मागदर्शनाप्रमाणे श्री विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनखाली पोउनि श्री संदिप गायकवाड, पोउनि श्री अर्जुन सांगळे यांच्यासह पोहवा/०४ चव्हाण, पोहवा/२८७७ टिंगरे, पोहवा/ २७५१ सांगळे, पोहवा/५३८ शेंडे, पोशि.१२७३ खेताडे, पोशि/९११ नरळे, पोशि/१६२५ भिताडे, पोशि/१८१७ मावलकर, पोशि/१६७१ निलेश गायकवाड, पोहवा/२४३८ कदम, पोहवा/२२६८ खाडे, पोशि/१८४७ पिसाळ, पोशि/८७० कोळी, पोशि/१८५३ गायकवाड, पोशि/१९८७ आव्हाड, पोशि/ २० मोरे त्याचप्रमाणे रे. सु. ब. सीएसएमटी मेन लाईनकडील सहा. उप निरीक्षक एकनाथ गडथे व आरक्षक डी. के. यादव यांनी पार पाडलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज