बेपत्ता सहा वर्षांच्या मुलीचा अखेर शोध माहिम पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ११ जून, २०२५

demo-image

बेपत्ता सहा वर्षांच्या मुलीचा अखेर शोध माहिम पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई, दि. ११ : मुंबईतील माहिम पश्चिम भागातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा शोध घेण्यात माहिम पोलिसांना यश आले आहे. मुलीच्या शोधासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजच्या आधारे सहा तासांत मुलीचा शोध लावण्यात माहीम पोलिसांना यश आले आहे. मुलगी सुखरूप असून धारावी परिसरात ती सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

IMG-20250610-WA0039

माहिम पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी सहा वर्षांची मुलगी दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती परतलीच नाही. शेवटी कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. कुटुंबियांनी स्थानिक माहिम पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी तत्काळ ४ पथकांची स्थापन करून मुलीचा शोध घेण्याच्या मागावर रवाना झाले.


मुलीचा शोध घेत असताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फुटेजची तपासणी करताना बेपत्ता मुलगी धारावीच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी तात्काळ इतर पथकांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने धारावी परिसरात शोध घेण्यात सुरूवात केली. तपासादरम्यान ९ जून रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास पोलिसांनी अल्पवयीन मुलगी धारावीतील मोठ्या मशिदी समोर सापडली. चौकशी केली असता ती बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबियांना देण्यात आली. शहानिशा करून मुलीचा ताबा तिच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले.

%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%20PRESS%20NOTE%20KIDNAPPING

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *