जैविक शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करावा स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप अध्यक्ष संदीप वासलेकर यांचे आवाहन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

demo-image

जैविक शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी करावा स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप अध्यक्ष संदीप वासलेकर यांचे आवाहन

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्काराचे वितरण


मुंबई, दादासाहेब येंधे : जगाला युध्दाचा धोका असून त्यात जैविक अण्वस्त्रांचा वापर होवू शकतो. तसे झाल्यास मानवी संहार होईल. त्यामुळे जैविक शास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जागतिक शांततेसाठी करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्ट्रॅटेजीक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष आणि महनिय प्रवक्ते संदीप वासलेकर यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणा-या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

 

IMG-20230107-WA0059

IMG-20230107-WA0058

IMG-20230107-WA0057

IMG-20230107-WA0056

IMG-20230107-WA0055

IMG-20230107-WA0054

IMG-20230107-WA0053

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आझाद मैदान येथील पत्रकार भवनात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी वासलेकर बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. संघाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, वैजयंती कुलकर्णी आपटे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे उपस्थित होते. आधुनिक क्षेपणास्त्र काही देशांकडे आहेत. ही क्षेपणास्त्रे मानव विरहित आहेत. ती क्षेपणास्त्रे रडारलाही दिसत नाहीत. ती स्वयंचलित आहेत. त्यामुळे आपोआप दिशा बदलतात. त्यामुळे ही क्षेपणास्त्रे अधिक धोकादायक आहेत. ही क्षेपणास्त्रे पडल्यास त्या भागातील शेकडो किलोमीटर अंतरावर मानवी संहार होईल. त्यामुळे युध्द टाळण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पत्रकारांनी जागतिक स्तरावर जागृती घडविण्याची गरज आहे. तसे झाल्यास पत्रकार हे मानवी कल्याणाच्या भवितव्याचे शिल्पकार बनू शकतील असा विश्वास वासलेकर यांनी व्यक्त केला.

सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस नसून या दिवशी त्यांनी "दर्पण" हे वृत्तपत्र सुरू केल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी स्पष्ट केले. या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी पत्रकार संघ पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवल्याचे ते म्हणाले. कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले.


यावेळी आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार राम खांदारे यांना प्रदान करण्यात आला. जयहिंद प्रकाशन पुरस्कार योगेश बिडवई, अजय कौटिकवार यांना, कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार हेमंत साटम यांना, विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार चंद्रशेखर कुलकर्णी यांना, नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार कमलेश सुतार यांना तसेच शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार सुरेश वांदिले यांना प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *