मुंबईत ड्रग्ज विकणाऱ्याला अटक, ३२ लाखांचे कोकेन जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १९ मे, २०२५

demo-image

मुंबईत ड्रग्ज विकणाऱ्याला अटक, ३२ लाखांचे कोकेन जप्त

मुंबई, (दादासाहेब येंधे) :  वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब जवळ रामकृष्ण परमहंस मार्ग विभागात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या ड्रग्ज तस्कराला खेरवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8

पोलिसांनी त्याच्याकडून ३२ लाख रुपये किमतीचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सध्या दोन्ही आरोपी खेरवाडी पोलिसांच्या ताब्याचा असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे.


खेरवाडी पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणारा आणि त्याला ड्रग्स पुरवणारा अशा दोघांविरोधात कलम ८ (क) सह २१ (ब), एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्लब परिसरातील रामकृष्ण परमहंस मार्ग रस्त्यावरील भिंती शेजारी एक व्यक्ती कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली होती.


गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ३ ग्रॅम इतके कोकेन हा अंमली पदार्थ बेकायदेशीर रित्या आढळून आला. खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने आरोपी जुनैद नईम स्वान, (वय, २६) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तो वांद्रे पश्चिम चिंबई भागातील नायजेरियन तरुणांकडून कोकेन खरेदी करत असल्याचे समजले.


खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नायजेरियन तरुणाला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातील ३२,४०,०००/- किमतीचा एकूण ८१ ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सध्या दोन्ही आरोपी खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात असून ते कोकेन हा अंमली पदार्थ मुंबईत कुठून आणायचे व त्यांच्यासोबत आणखी कितीजण सहभागी आहेत याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20PRESS%20NOTE---docx

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *