सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी
मुंबई, दि. ९ : दिनांक ०४/०१/२०२३ रोजी सीएसएमटी रेल्वे लोकल लाईन येथे रात्रपाळी ऑन ड्युटीवर कर्तव्यावर असताना पो.ना २२५१ देवकर यांना R-track वरून २३.०५ वाजता कॉल आला असता कळविण्यात आले की, २३.०७ वाजताच्या दरम्यान येणारी फास्ट लोकलच्या सीएसएमटी बाजूकडील फर्स्ट क्लासच्या मागच्या जनरल डब्ब्यामध्ये रॅक वर एक काळ्या रंगाची बॅग त्यामध्ये कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, मॉडेल नंबर आर-६ व कॅमेऱ्याचे सामान असे एकूण किंमत ३,००,०००/-रुपये आहे अशी बॅग विसरली आहे.
अशी माहिती मिळताच तातडीने सदरहू गाडी तपासली असता नमूद रंगाची बॅग मिळून आली असता तक्रारदार श्री. रुपेश आंधळे, वय २६ वर्ष, राह-डोंबिवली(प.) मोबाईल नंबर 7744880749 यांना पोलीस ठाणेत बोलावून विचारपूस करून खात्री करून रात्रपाळीचे ठाणे अंमलदार पो.हवा ३२७४ विभूते यांच्या समक्ष पो. नाईक देवकर यांनी तक्रारदाराच्या ताब्यात परत दिली. आपली बॅग संपूर्ण सामानासहित परत मिळाल्यामुळे तक्रारदार आंधळे यांनी जीआरपी पोलिसांचे कौतुक केले.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा