मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याने तब्बल १३ कोटी ३७ लाख ६० हजार किमतीचे एकूण सहा किलो ६८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

तपासादरम्यान, रेहान शेख नावाचा एक व्यक्ती आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एमडी ड्रग्जची विक्री करताना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याच्याकडे साडेचार लाखाचे एमडी सापडले होते. त्याच्याकडे कसून तपास केला असता पोलिसांना आणखी चार एमडी विक्रेत्या आरोपींची माहिती मिळाली.
त्यांना अटक करून पोलिसांनी या पाचही आरोपींकडून तब्बल तेरा कोटी पेक्षा जास्त किमतीचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. दरम्यान, १३ कोटी ३७ लाख ६० हजार किमतीचे एकूण सहा किलो ६८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज नेमके आले कुठून याची पोलीस चौकशी करत आहेत. यात आणखी कितीजण सहभागी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा