‘लिव्ह टू गिव्ह’चा मदतीचा हात - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ७ जुलै, २०२४

demo-image

‘लिव्ह टू गिव्ह’चा मदतीचा हात

आदित्य ठाकरेंच्या हस्ते फोटोग्राफर, व्हिडिओ जर्नालिस्ट यांना रेनकोट वाटप


मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि ‘लिव्ह टू गिव्ह’ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य असणाऱ्या छायाचित्रकार आणि व्हिडियो जर्नालिस्ट यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी मंत्री, आमदार माननीय आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात रेनकोटचे  वाटप करण्यात आले.

IMG-20240707-WA0046

(आदित्य ठाकरे यांच्याकडून रेनकोट  स्वीकारताना ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम बडेकर. सोबत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, कार्यकारिणी सदस्य अंशुमन पोयरेकर, राजेश खाडे आणि ‘लिव्ह टू गिव्ह’ संस्थेचे संचालक मर्जी पारेख)


‘लिव्ह टू गिव्ह’ संस्थेचे संचालक मर्जी पारेख, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, कार्यकारीणी सदस्य अंशुमन पोयरेकर आणि राजेश खाडे आणि या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणार संघाचे सदस्य पीटीआयचे व्हिडीयो जर्नालिस्ट आदित्य सावंत यावेळी उपस्थित होते.

2

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार घनश्याम बडेकर, दिलीप पवार, प्रभाकर वराडकर, प्रदीप कोचरेकरसहीत अनेकांचा आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. दिडशे रेनकोटचे यावेळी वितरण करण्यात आले. अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *