सीएसएमटी येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

सीएसएमटी येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

मुंबई, दादासाहेब येंधे : ०२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस ध्वज अर्पण करण्यात आला होता. त्यामुळे ०२ जानेवारी हा महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी या कालावधीत रेझींग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे.


त्यानिमित्ताने आज दिनांक सकाळी ११.३० दरम्यान 'रेझिंग डे' च्या अनुषंगाने  सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे समोर  रेल्वे  पोलीस मुख्यालय घाटकोपर येथील पोलीस वाद्यवृंद पथकामार्फत  देशगीते, महाराष्ट्र गीते सादर करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.


     व्हिडिओ पहा...👇


सदर कार्यक्रमाचा रेल्वे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला व उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपक्रमाचे कौतुक केले. प्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन मोरे, ३० पोलीस अंमलदार तसेच घाटकोपर मुख्यालयातील बँड पथक आदी उपस्थित होते. अशी माहिती  सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज