केक कापून, प्रवाशांमध्ये जनजागृती करून साजरा केला जागतिक महिला दिन
मुंबई, दादासाहेब येंधे : ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मा. श्री. रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे संकल्पनेनुसार सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे परिसरामध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस ठाणे समोरील प्रांगणात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस अधिकारी, अंमलदार व महिला दक्षता समिती सदस्य यांच्याकडून केक कापण्यात येऊन महिला रेल्वे प्रवासी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान घ्यावयाचे दक्षतेबाबत पत्रके वाटण्यात आली. त्याचप्रमाणे खाकीतील सखी या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन वर तसेच महिलांच्या राखीव डब्यात महिला प्रवासी यांना खाकीतील सखी क्यू आर कोड बाबत माहिती देण्यात आली तसेच त्याबाबतची पत्रके देखील वाटण्यात आली.
त्याचप्रमाणे दिन दुबळ्या, वंचित लोकांना आश्रित ठेवून त्यांचा उदरनिर्वाह करून सामाजिक बांधिलकी जपणारे संत श्री जलाराम सेवा संघ यांचे सदस्य श्री. नितीन दावडा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून यथोचित्त सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर लोकप्रिय जादूगार श्री. धीरज भंडारे यांनी जादूचे खेळ सादर करून त्याद्वारे जमलेल्या रेल्वे प्रवाशी यांना जनजागृतीबाबत मार्गदर्शन देखील केले.. सदर कार्यक्रमास रेल्वे प्रवाशांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.
सदर कार्यक्रमाकरिता पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती मदकट्टे, पोलीस उपनिरीक्षक ईर, पोलीस उपनिरीक्षक बिपीन पाटील तसेच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे मधील महिला पोलीस अंमलदार, रेल्वे सुरक्षा बल, सीएसएमटी येथील महिला कर्मचारी, सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथील तिकीट तपासणी महिला कर्मचारी, सीएसएमटी महिला सुरक्षा समितीच्या महिला सदस्य तसेच महिला प्रवासी उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात महिला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सदर उपक्रमाचे महिला रेल्वे प्रवाशांकडून स्वागत व कौतुक करण्यात आले. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा