मुंबई, दि. १ मे : वसईतील कामनगाव येथील सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या कंपनीत सुरू असलेला अमली पदार्थाच्या कारखान्यावर साकिनाका पोलिसांनी छापा टाकून ८ कोटींचे एमडी हस्तगत केले आहे.
या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. २०२३ पासून आतापर्यंत, साकीनाका पोलिसांनी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील ४५० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले आहेत अशी माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.
२४ एप्रिल रोजी, साकीनाका पोलिसांच्या पथकाने विशिष्ट माहितीवरून कारवाई केली आणि साकीनाका येथील रेतीवाला कंपाउंडमधून २८ वर्षीय सादिक शेख याला ५३ ग्रॅम मेफेड्रोनसह अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत १० लाख रुपये होती. शेख यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ६० तासांच्या आत वसईतील कामणगाव येथील एका कारखान्याचा शोध लावला.
सिमेंट ब्लॉक बनवण्याच्या नावाखाली, कारखान्याचा वापर मेफेड्रोन तयार करण्यासाठी केला जात होता. कारखान्यातून एक सेंट्रीफ्यूगल मशीन आणि दोन रेफ्रिजरेटर जप्त करण्यात आले. सेंट्रीफ्यूगल मशीन्सचा वापर द्रव पदार्थांना घन पदार्थात रूपांतरित करण्यासाठी केला जात होता तर रेफ्रिजरेटर्सचा वापर थंड होण्यासाठी आणि घन पदार्थांना क्रिस्टल स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी केला जात होता. २६ एप्रिल रोजी कारखान्यातून ८ कोटी रुपये किमतीचे चार ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेख सोबत पोलिसांनी सिराज पंजवानी यालाही अटक केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा