दहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

demo-image

दहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ठोकल्या बेड्या

मुंबई, (दादासाहेब येंधे) : चुनाभट्टी पोलिसांच्या एटीसी पथक आणि परिमंडळ-6 यांच्या विशेष पथकाने हद्दीतील संशयितरित्या हालचाली करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक कोटी ९० लाख रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी एकूण कारवाई मध्ये तब्बल दहा कोटी ५३ लाख रुपयांचा अफगाणी चरस जप्त केला आहे. 

%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%20%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे एटीएस पथक आणि परिमंडळ-६ विशेष पथके पोलीस ठाण्याचे हद्दीत गस्ती घालत असताना रहीम माजिद शेख (वय, ३० रा.डुंगरी लिंक रोड, वलसाड गुजरात) संशयितरित्या फिरताना आढळला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे तब्बल एक किलो ९०७ ग्रॅम वजनाचे चरस ज्याची किंमत एक कोटी ९० लाख रुपये आहे. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मुंबईत आल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी पोलीस हवालदार नितेश विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी गुन्ह्याचा अधिक तपास गुजरात राज्यातील वलसाड या ठिकाणावरून कधी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नितीन शांतीलाल टंडेल (वय, ३२, रा. वलसाड गुजरात) असे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीकडे तब्बल आठ किलो १४६ ग्रॅम वजराचे अफगाणीचा रस ज्याची किंमत अंदाज आहे आठ कोटी दहा लाख ४६ हजार रुपये अंमली पदार्थ आरोपीकडून जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून तब्बल १० किलो ५३ ग्रॅम वजनाचे चरस अंदाजे किंमत १० कोटी ५३ हजार एवढा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या त्यांना पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.


सदरचा उत्कृष्ट तपास पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-६, नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त नेहरूनगर विभाग युसुफ सौदागर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस निरीक्षक राजु ठुबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन ढोबळे, पोलीस हवालदार नितेश विचारे, सतिश शेळकंदे, पोलीस शिपाई अमोल सरडे, अमोल यमगर, राऊत, सानप, माळवे यांनी केलेली आहे.

%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%20NDPS%20CR%20219-25%20Press%20note

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *