शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखविणारी टोळी उद्धवस्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, २८ एप्रिल, २०२५

demo-image

शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखविणारी टोळी उद्धवस्त

मुंबई, (दादासाहेब येंधे) : शून्य टक्के व्याजदराने कर्जाचे प्रलोभन दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी टोळी सायबर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी नवी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १०५ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या मोबाइल फोनचा जवळजवळ १३५ फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यांत वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 

IMG-20250425-WA0007

मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला कर्जाची गरज होती. कर्जासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने बजाज फायनान्स येथून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिक असल्याने शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, अशी माहिती दिली. एका बँकेचा लोगो आणि स्टॅम्प असलेली बनावट कागदपत्रे वृद्धाला पाठवली. तसेच, वेगवेगळी कारणे पुढे करून त्यांच्याकडून एक कोटी १४ लाख रुपये उकळले. 


फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. गुन्ह्यात वापरलेले मोबाइल, बँक खाती, तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस निरीक्षक मंगेश मजगर, सहायक निरीक्षक पुनम जाधव यांनी पथक बनवून तपास सुरू केला. तपास करत असताना पोलिसांना दिल्ली येथे एक कॉल सेंटर सुरू असल्याचे समजले. दिल्ली येथील हरीनगर परिसरात असलेल्या 'मॅक्सिमायझर मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला.


शेहजाद खान उर्फ रहमान, अनुज रावत उर्फ अनिलकुमार, आमिर हुसेन या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १०५ मोबाइल फोन आणि एक लॅपटॉप हस्तगत केला. सायबर फसवणुकीसाठी ही टोळी याच मोबाइल फोनचा वापर करीत असल्याचे समोर आले.

press%20note%20delhi%202_1
press%20note%20delhi%202_2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *