रेझिंग डे निमित्ताने सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी चार लाखांचा ऐवज केला परत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

demo-image

रेझिंग डे निमित्ताने सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी चार लाखांचा ऐवज केला परत

पोलीस ठाणेत राबवली मुद्देमाल 
परत करण्याची विशेष मोहीम


मुंबई, दादासाहेब येंधे :  रेझींग डे सप्ताहाच्या अनुषंगाने ०८/०१/२०२५ रोजी सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील चोरीच्या गुन्ह्यातील उघडकीस आलेल्या गुन्ह्यांतील ०९ मोबाईल फोन, ०२ लॅपटॉप, ०१ सोन्याची चेन, रोख रक्कम तक्रारदारांना परत  देण्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती.


IMG-20250108-WA0038

प्रसंगी सन २०२४ मधील १२ तक्रारदार सन २०२५ मधील ०२ तक्रारदार असे एकुण १४ तक्रारदारांना पोलीस ठाणेत बोलावून एकुन ४,००,०००/- (चार लाख रुपये) किमंतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यावेळी पोउपनिरीक्षक ज्योती मदकट्टे व ०५ पोलीस अंमलदार हजर होते.


IMG-20250108-WA0029

उपस्थित तक्रारदार यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक करताना  पोलिसांचे आभार मानले आहेत. अशी माहिती सीएसएमटी  रेल्वे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *