जिल्हास्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धा उत्साहात संपन्न - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

जिल्हास्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धा उत्साहात संपन्न

मुंबईसह ठाणे आणि वसई येथील स्पर्धकांनी नोंदवला सहभाग 

दि.९/१०/२०२२

मुंबई, दादासाहेब येंधे: वडाळा येथील एस. आय. डब्लू. एस. शाळेत रविवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट्स आणि तांग. सू. डो. चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईसह ठाणे आणि वसई येथील स्पर्धकांनी देखील आपला सहभाग नोंदवला होता. कार्यकारणी समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अजय शाह यांच्या हस्ते करण्यात आला तसेच त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धेस सुरुवात झाली. 


एस. आय. डब्लू. एस. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. सुरेश गिरी तसेच स्वाध्याय शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. सतीश चंदे व एन. के. इ. एस. शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. संतोष कुमार यांचे अतीथ्य या स्पर्धेस लाभले. प्रसंगी क्रीडा प्रशिक्षक जनार्दन सर, ठाणे जिल्हा सिकई प्रमुख रझिया मिस, तांग. सू. डो. जिल्हा सचिव लोचन मोहिते, जिल्हा सदस्य रितीक कांबळे, आयुष शाह इत्यादी मान्यवरांनी स्पर्धेत उपस्थित राहून स्पर्धकांबरोबर स्पर्धेचा आनंद घेतला. जवळजवळ २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.



या स्पर्धेत परळ बेस्ट कामगार वसाहतीमधील प्रशिक्षण वर्गातील खेळाडूंनी तन्वी येंधे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखदार कामगिरी बजावत १६ सुवर्ण पदके, ४ रौप्य पदके आणि ६ कांस्य पदके पटकावली. त्यात विरा पवार, अद्विक पांचाळ, रमा यादव, स्वरा मोरे, अंचती पांचाळ, सम्यक नाईक, सुनिधी स्वार, श्रावणी कुरणे, पूजा जयभाये, स्वरा वंजारे, समृद्धी कुरणे, वृष्णा यादव आणि हरी यादव यांनी या स्पर्धेत सर्वाधिक पदके प्राप्त करून बेस्ट कामगार वसाहतीमधील प्रशिक्षण वर्गाला तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवून दिला. तसेच विजयी स्पर्धकांना अत्यंत आकर्षक पदक व स्मृतीचिन्ह देण्यात आले. 













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज