कुर्ल्यात लागलेल्या आगीत ३३ रहिवाश्यांनी सुटका - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

कुर्ल्यात लागलेल्या आगीत ३३ रहिवाश्यांनी सुटका

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

मुंबई, दि.९: लोकमान्य टिळक टर्मिनस जवळील रेल व्ह्यू इमारतीच्या बाराव्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत ३३ प्रवाशांची अग्निशमक दलाने थरारकरीत्या सुटका केली त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.





रेल व्ह्यू इमारतीला दुपारी २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास आगेचा भडका उडाला. या ठिकाणी असणारी वायरिंग, अडगळ, घराच्या लाकडी दरवाजे आणि घरातील कपडे आदी सामानाची पेट घेतल्याने आगीचा प्रचंड धूर निर्माण झाला. हा धूर अकराव्या मजल्यावरही पसरल्याने एकच घबरड निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी इमारतीच्या खाली धाव घेतली. तर काहीजणांनी आग आणि धुरापासून वाचण्यासाठी खिडकी, सज्जाचा आधार घेतला शिवाय काहीजण वरच्या मजल्यावर अडकून पडले होते. आग वाढत गेल्याने अग्निशमन दलाने 'लेवल-२' ची आग जाहीर केली यावेळी अग्निशमन दलाच्या बचाव कार्य सुरू केले. यामध्ये अग्निशामक दलाने शिडी आणि दोरीच्या साह्याने ३३ जणांची सुटका केल्याने मोठे दुर्घटना टळली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज