१०५ जणांनी घेतला लाभ
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर नुकतेच संपन्न झाले. या शिबिराला सदस्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन शिबिराचा लाभ घेतला.
कोरोनाचा मुंबई शिरकाव झाल्यापासून सर्व पत्रकार बंधु अविरतपणे फ्रन्टलाइन वर काम करीत आहेत. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे (शुक्रवार दिनांक २९ जुलै २०२२ रोजी) पत्रकार संघात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लवकरच पत्रकार संघातर्फे हृदय तपासणी महिलांमधील कर्करोगाबाबत जनजागृती करणे बाबत हायटेक आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहोत. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाबळे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा