मुंबई : नशेबाजांना विकण्यासाठी आणलेल्या कप सिरपच्या बाटल्यांचा साठा शिवाजीनगर पोलिसांनी पकडला. हा साठा घेऊन आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धनंजय देवडीकर व पथक रफिक नगर परिसरात गस्त घालत असताना तेथील शौचालयाच्या बाजूला पार्किंग मध्ये रिक्षात दोन तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसले. त्यामुळे देवडीकर यांनी चौकशी केली असता त्यांच्याजवळ कफ सिरपच्या ४३० बाटल्या मिळून आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात सिरपच्या बाटल्या का व कुठून आणल्या याबाबत विचारणा केली असता नदीम शेख(वय, ३१) आणि साहिल खान (वय,२१) यांना काहीच उत्तर देता न आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा