सर जे जे रुग्णालयात ‘हेल्प डेस्क’ सुरु करा ; जीवन प्रबोधिनी ट्रस्ट ची मागणी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

demo-image

सर जे जे रुग्णालयात ‘हेल्प डेस्क’ सुरु करा ; जीवन प्रबोधिनी ट्रस्ट ची मागणी

मुंबई दि. १५ : सर जे.जे. रुग्णालयात ‘हेल्प डेस्क’ सुरु करा अशी मागणी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक श्री. सत्यवान नर यांनी सर जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सुप्रिया प्रभाकर सापळे यांची भेट घेऊन केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री.प्रशांत पवार,भाऊसाहेब शिंदे, गिरीश माकवाना, मुकेश शिंदे, शरद अडागळे हे देखील उपस्थित होते. 

IMG-20230915-WA0030

सर जे.जे. रुग्णालयात भारताच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारोच्या  संख्येने रुग्ण, त्यांचे नातेवाईक येत असतात. मात्र या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कुठल्या डॉक्टरची ओपीडी कधी आहे ? कुठल्या आजाराचे उपचार कोणत्या कक्षात होतात या सर्वांची माहिती समजत नाही. त्यामुळे रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा  वेळ वाया जातो व गोंधळ उडतो. त्यामुळे सर जे.जे.  रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी ‘हेल्प डेस्क’ सुरु करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच हेल्प डेस्क सुरु करताना रुग्णालयांच्या  प्रवेशद्वार किंवा नोंदणी कक्ष या ठिकाणी केबिन तयार करून  या ठिकाणी रुग्णांची मदत करण्याच्या दृष्टीने रुग्णांना, त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित मदत करण्यासाठी, वेळेप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र, संवाद कौशल्य उत्तम असलेले आणि सॉफ्ट स्किल्स व्यवस्थित रित्या आत्मसात केलेले कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. या कर्मचाऱ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असेल त्याच बरोबर संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल. या हेल्प डेस्क वरती संगणक, दूरध्वनी, नोंदणी पुस्तिका आणि सूचना पेटीची व्यवस्था सुद्धा असेल अशी व्यवस्था करण्याबाबत ची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत लवकरच आवश्यक पाउले उचलले जातील असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सुप्रिया प्रभाकर सापळे यांनी संस्थेच्या पदाधिकारी यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *