Ticker

बलात्कार प्रकरणातील तीन वर्षांपासून फरार आरोपीस अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुजरातमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी त्याचे नाव बदलून पोलिसांचा वेळोवेळी चकवा देत होता. अटक टाळण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केल्याचेही तपासात उघड झाले आहे. 

कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२२ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण व तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील आरोपी नौशाद इसरार अहमद (वय, २२ वर्षे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून परराज्यात पळून गेला होता. तो आपले अस्तित्त्व लपवून तीन वर्षांपासून गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथील वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. यावेळी त्याने स्वतःचे नाव व ओळखही बदलली होती. गेल्या तीन वर्षांंपासून आरोपीने पोलिसांचा गुंगारा देण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केला. 


आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी हा गुजरातमधील पदमला परिसरातील कुरियर कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नौशादचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो गुजरात राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथे वारंवार प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार वारंवार तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील नौशाद याची माहिती मिळवली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथक गुजरातमध्ये रवाना झाले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला. पथकाने सापळा लावल्यानंतर नौशादला पकडण्यासाठी घेराव घातला. त्यानंतर त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यावेळी आरोपीची पडताळणी करण्यात आली असतो तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करून मुंबई आणण्यात आले. सर्व सिमकार्ड आरोपीने गुजरातमधून खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का. व सु.) श्री. सत्य नारायण चौधरी, तसेच श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, श्री. गणेश गावडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, मुंबई व सुर्यकांत बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त, कुर्ला विभाग, मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र क्षिरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वि.भा. नगर पोलीस ठाणे यांनी तसेच पो.उ.नि. भाऊसाहेब सोनवणे, तांत्रिक विश्लेषक पो.ह. पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह. राजेश पंचरास, पो.ह. रामचंद्र पाटील, पो.ह. खेमु राठोड, पो.शि. गोरख पवार, पो.शि. रामदास निळे व पो.शि. प्रितम मेढे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या