मुंबई, दि. २८ : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून दीपावलीच्या निमित्ताने कॅन्सर ग्रस्त लहान मुले आणि त्यांच्या पालकांसमवेत एक क्षण विरंगुळा या कल्पनेतून रविवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत दिवाळी साजरी केली.

यावेळी या मुलांसाठी जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या वीस व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला. तसेच यावेळी दंत चिकित्सा शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हरीश पाठक, अधिष्ठाता के.ई.एम. रुग्णालय मेडिकल कॉलेज, उमेश पोवार, आकार कन्सल्टंट संचालक, महेश मुदलीयार, विश्वस्त, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, रतिश पाटील, तलाठी पंथ फर्म, श्रीकृष्ण हरचांदे, ज्येष्ठ स्तंभलेखक, संजय कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या संस्थेचे संस्थापक सत्यवान नर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर आणि संयोजक गणेश पार्टे यांच्यासह संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्तम आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे कॅन्सर ग्रस्त लहान मुले आणि त्यांचे पालक यांनी या कार्यक्रमाचा आनंद मनमुरादपणे लुटला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा