विमान उतरतानाच दोन तुकडे - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

demo-image

विमान उतरतानाच दोन तुकडे

मुंबई, दि. १५ : विशाखापट्टणम येथून मुंबईला येणारे लहान आकाराचे विमान गुरुवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरून फेकले गेले. त्यामध्ये विमानाचे दोन तुकडे होऊन पाच प्रवाशांसह आठ जण जखमी झाले आहेत.

IMG-20230914-WA0047

IMG-20230914-WA0048

IMG-20230914-WA0049

IMG-20230914-WA0051

IMG-20230914-WA0052


व्हीटी-डीबीएल या नावे नोंदणी असलेले लियरजेट या अमेरिकी कंपनीचे हे विमान दिलीप बिल्डकॉन या भोपाळच्या कंपनीच्या मालकीचे होते. विशाखापट्टणम येथून मुंबईच्या विमानतळावर उतरत असताना विमानाचा वेग  होण्याऐवजी ते घसरत जाऊन बाहेर फेकले गेले. त्यामध्ये पाच प्रवासी एक विमान कर्मचारी आणि दोन वैमानिक होते. अपघातात विमानातील सर्व आठजण जखमी झाले आहेत. त्यांना अंधेरीच्या क्रिटी केअर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *