मुंबई, (दादासाहेब येंधे) : सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम वर्षानुवर्षे राबविणारे व आपल्या कार्याचा आदर्श इतर सार्वजनिक मंडळ राबवितात, अशा चिंचपोकळी, लालबाग-परळ परिसरातील गणेशोत्सव साजरे करणारे सर्वात जुने व अग्रगण्य अशा समजल्या जाणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने इयत्ता ५ वी ते १२ वी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवार २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वा. पार पडला.

मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल उमानाथ पै, प्रमुख अतिथी मनिष श्रीधनकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळाचौकी पोलीस ठाणे), सचिन कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा पोलीस ठाणे) चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत, कोषाध्यक्ष विकास सावंत यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन उप मानद सचिव विकास शिंदे यांनी केले. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा आपले १०६ वे वर्ष साजरे करीत आहे. अशी माहिती मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली.
0 टिप्पण्या