वेळ आली होती मात्र, खाकीमुळे काळ आला नाही - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

सोमवार, १९ जून, २०२३

वेळ आली होती मात्र, खाकीमुळे काळ आला नाही

वयोवृद्ध महिलेचा वाचवला जीव

मुंबई, दादासाहेब येंधे : वेळ दुपारची. दोन वाजून एकोणीस मिनिटं. लोकल माहीम स्टेशनवर आली. आणि तेवढ्यात एक महिला रुळावरून फलाटावर चढण्याच्या प्रयत्नात होती. पण, तिला पटकन चढता येत नव्हते. तेवढ्यात समोरून धडधडत लोकल आली. ती महिला लोकल आणि फलाट यांच्या मध्ये अडकणार तेवढ्यात अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नवले यांनी सदर घटना तात्काळ हेरली आणि कशाचीही परवा न करता धावत जाऊन त्या महिलेचा जीव वाचवला.

*व्हिडिओ 👇पहा...*



अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई धोंडीबा दत्तू नवले(०४४ /२०१८)  हे दिनांक १७ जून २०२३ रोजी दुपारी २ वाजून १९ मिनिटांच्या दरम्यान त्यांच्या घरून माहीम रेल्वे स्टेशन क्रमांक १ वर अंधेरी येथे आपल्या ड्युटीवर जात जाण्यासाठी उभे होते. दरम्यान, त्या ठिकाणी एक महिला रूळ ओलांडून फलाटावर चढत असताना त्यांना दिसली. त्याच वेळेत समोरून लोकल आली. ती महिला त्या लोकलखाली जाणार एवढ्यात पोलीस शिपाई नवले आणि स्वतःच्या जीवाची परवा न करता सदर महिलेला काही सेकंदाचा अवधी असताना तिचा हात पकडून फलाटावर खेचले व तिचा जीव वाचवला. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज