आरोपीस दादर लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दि. ९/८/२०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग चोरून पळून जाताना महिलेला एक्स्प्रेसमधून ढकलून दिल्याची घटना रविवारी रात्री दादर स्थानकात उघडकीस आली. सुदैवाने तरुणी बचावली असून रेल्वे पोलिसांनी मनोज चौधरी (रा. मध्य प्रदेश) याला या प्रकरणी अटक केली आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत मनोजला सीएसटीएम स्थानकातून ताब्यात घेतले. मनोज हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो पुणे येथे खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पगार न मिळाल्याने त्याने नोकरी सोडली. तो पुन्हा गावी जाणार होता. गावी जाताना लुटमार करण्यासाठी तो डब्यात शिरला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने चोराला पकडण्यात आल्याचे दादर लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा